मन उनाड
मन उनाड
मन बजिंदी उनाड जणू
मन पाखरू उडे भिर्भिरु
अबोल मनी घेई उड़ान
क्षणात मनरंगे नभ गेरू
नजर खिळे आभाळी
कधी घेरते मेघासही बंदिनी
जन्माने जरी जवळ करी
आकाशा सागराचा तळाशी
वसे कधी लाटांसवे हेलकावा
मनभिरू ते मनोहरी
आभासिक जग निहारी
मन व्यपुनी जग सार
कवडस्याशी स्पर्धा करी
मन अस उनाड होऊनी
मन मानीनी सलगी करी
