सोनकिडा आणि रातकिडा
सोनकिडा आणि रातकिडा
धुंद अशा या कातरवेळी
घनदाट निबिड त्या तरूतळी
गर्दी दाटली रातकिड्यांची
सोबत त्यांना सोनकिड्यांची
लाल जांभळ्या त्या नभांगणी
तीव्र बिजली ती लखलखली
पसरला पुन्हा किर्र अंधार
दिसे काजवा जर्द अंगार
किर्र किर्र त्या किरकिरण्याची
जर्द जर्द त्या चकाकण्याची
रातकिड्यांची सोनकिड्यांची
स्पर्धा लागली त्या दोघांची
लाल जांभळ्या त्या आकाशी
काजवा दिसे तो सोनेरी
काळ्या ढवळ्या त्या प्रकाशी
दामिनी असे ती रुपेरी
सजली नभात ती सांजवेळ
करत रंगीत प्रकाशखेळ
सोबत असते त्या जोडींची
काजवा आणि रातकिड्यांची

