STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Fantasy Inspirational

3  

Ganesh G Shivlad

Fantasy Inspirational

मृदगंध पाऊसाचा

मृदगंध पाऊसाचा

1 min
334

येता पाऊस पृथ्वीशी,

वारा वाहतो खट्याळ.

नेतो ओढून ढगांना,

पार करतो घायाळ.


ढगासंगे पाऊसही

जाई क्षणात वाहून.

करी दुष्काळ जाहीर,

येणे नाही परतुन.


ढग मागती आसरा,

करती हो विनवणी.

झाडे लावुनी वाढवा,

देती विपुल ते पाणी.


झाडे आडविती वारा,

होती उदार जीवाशी.

मातेसम ते रक्षिती,

जल माती जमिनीशी.


वृक्ष थांबविती धुप,

मुळा घट्ट आवळती.

माय मानून भूमीला,

जिवभाव ओवाळती.


वृक्ष आणती पाऊस,

गंध चोफैर मातीचा.

सुखावून मग जातो,

मृदगंध पाऊसाचा.


किती दिसतो सुंदर,

पाऊस तो पानांवर.

थेंबथेंब भासे मोती,

लतावेली वृक्षांवर.


झिरमिर झिरमिर

धून सुगम संगीत.

मिळे आनंद स्वर्गीय,

झाड पावसासोबत.


वृक्ष पोसती मानवा,

देती फळ फुल धान.

चला आपणही पोसू,

अर्पूनिया तन मन.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy