STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Fantasy

3  

Rutuja kulkarni

Romance Fantasy

रिमझिम पावसाशी

रिमझिम पावसाशी

1 min
194

तुला तो पाऊस नेहमीच आवडायचा

मला मात्र पावसाचा प्रचंड राग यायचा.

मला अजिबातं भिजायला नाही आवडायचे

पण तुला पावसातं भिजताना पाहिले की मन तृप्त व्हायचे.. 


तुला हवाहवासा वाटायचा तो दरवळ मातीचा

मी मात्र चिखल पाहिला की चिडचिड करायचे

माझे हे वागणे पाहून तुला हसू नाही आवरायचे

मगं मात्र या चिखलावर ही प्रेम ओतु जायचे..


मला तो छेडणारा गारवा खूप त्रासदायक वाटायचा

तुला मात्र या गारव्यात गीतं सुचायचे

या रिमझिम पावसाशी मला

फक्त तुझेच प्रेम तर जोडायचे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance