आभाळ
आभाळ
चाहूल लागताच पावसाची
आभाळ भरुन आलं
काळ्याकुट्ट ढगांनी
रम्य सायंकाळ अन् सोनेरी किरण
आसमंत जणू दुमदुमला आनंदानी
गच्च दाटलेलं आभाळ त्यात पाऊस मुसळधार
शिवार दरवळे नव्या सुगंधानी
आभाळातल्या चांदण्या थेंबाच्या
रूपाने अलगद जमिनीवर येई
धरणीला हिरवेगार करी जणू नटलेल्या पाचूंनी
कधी निळे कधी काळे तर कधी अलगद लाल-केशरी झाकून धरणीला हे बरसे ओल्याचिंब सरींनी
चिमणी पाखरे मुक्तपणे आभाळभर फिरे
पाऊस पडू लागल्यावर हळूच घरट्यात शिरे
गाणे गात असे मधूर कंठानी
मग मन ही आठवणीला अलगद घेई कवेत कुठून येई कोण जाणे अचानक थंड गारवा हवेत
गच्च दाटलेल हे आभाळ कोसळणारा पाऊस बघून
बहरलेल्या हिरव्या जगात सैर करावी मग रानातली गजबजलेल्या हिरव्या रानाला गोष्ट सांगावी मनातली
