मन कोणी पाहिलंय का..?
मन कोणी पाहिलंय का..?
किती अजब आहे ना हे मन..त्याला कोणी पाहिलं नाही ,कोणाला ते कसं दिसतं हे माहीत नाही..पण त्याला तेवढाच जास्त समाजात मान आहे..
म्हणजे बघा ना..मनात काहीतरी चालू आहे, कुठेतरी भरकटलेलं आहे,"मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला हे तू",
तर कधी त्याला कोणीतरी आवडु लागलयं, तेव्हा"मेरा मन क्यों तुम्हे चाहे" अशी गाणी सुचतात..
असं हे मन कधीच स्थिर नसतं, काहीचं चंचल असतं तर काहीचं पाषाणासारखं..
आयुष्यभर हे मन आपल्याला या ना त्या मोहात झुरवत असतं..
कधी आपल्या तर कधी दुसर्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो..
काही जणांचं मन अगदी निर्मळ झऱ्यासारखं साफ तर काहीचं अगदीचं कोळश्यासारखं काळकुट्ट..
काहिंच्या मनात काहीच राहत नाही, तर काही मनकवडे असतात..
काहींना न बोलताच मनातलं कळतं, तर काहींना शब्दांत बोलुन ही मनातलं कळतं नाही..
कोणाच्या मनात काय चालु आहे..याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही..आणि समोरच्या व्यक्तिच्या मनात होणारी घाळमेळ काही संपत नाही..
मन दिसत तर नाही, पण मनाने ठरवलं तर काहीही करु शकतो..
ते चांगलं असेल तर आपण सगळ्यांशी चांगले वागतो,ते रागात असेल तर तो राग कधीही उफाळुन येऊ शकतो..
मन दिसत नसलं तरी आता आपण जिथे आहोत तिथुनच आपल्याला सगळ्या जगाची सैर करुन आणु शकतं ,एव्हढी प्रचंड इच्छाशक्ती मनाकडे असते..
आपण कधी मन मारुन जगतो,तर कधी मनाला स्वच्छंद करुन जगाचा आनंद घेत असतो..
कधी कोणी आपलं मन चोरुन नेतं,तर कधी आपण कोणाच तरी मन चोरतो.."ऐ मन कर दा हे ठगीठोरीयां,ऐ मन कर दा हे सीना जोरीया.."
म्हणुन मनाला बेभान करुन जगा "मन उधान, गूज पावसाचे ,का होते बेभान, कसे गहिवरते"
मनाला सावरु दया,बागडु दया,धडपडु द्या..मनासारखे जगा आणि मनापासुन जगा.....