आयुष्य म्हणजे...?
आयुष्य म्हणजे...?
आयुष्य म्हणजे एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करायला शिका,
आयुष्य सुंदर आहे, त्याचं कौतुक करायला शिका,
आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे, ते नेहमी लक्षात ठेवायला शिका,
आयुष्य एक आव्हान आहे, ते स्वीकारायला शिका,
आयुष्य म्हणजे कर्तव्य, ते पूर्ण करायला शिका,
आयुष्य सुंदर खेळ आहे, ते तेवढ्याच सुंदर रितीने खेळायला शिका,
आयुष्य म्हणजे वचन, त्याची पुर्तता करायला शिका,
आयुष्य म्हणजे दु:खाच
ी झळ, त्यातून सावरायला शिका,
आयुष्य म्हणजे मधुर संगीत, ते गायला शिका,
आयुष्य म्हणजे खडतर प्रवास, त्यातून वाट काढायला शिका,
आयुष्य म्हणजे शोकांतिका, त्याचा निडरतेने सामना करायला शिका,
आयुष्य म्हणजे साहस, त्याला तितक्याच साहसीपणे तोंड द्यायला शिका,
आयुष्य म्हणजे नशिबाचा खेळ, आर या पार खेळायला शिका,
आयुष्य खूप किंमती आहे, ते चांगल्या कामासाठी सत्कारणी लावा,
बाकी मस्त जगा आणि मनापासून जगा...