STORYMIRROR

Priyanka Chavan

Others

4.1  

Priyanka Chavan

Others

मित्र...

मित्र...

1 min
11.7K


एक तरी मित्र असा हवा,

जरी त्याच्याकडे न बघता पुढे गेले, तरी मागून आवाज देणारा

आपल्यासाठी हसणारा, वेळ आलीच तर अश्रुही पुसणारा,

स्वत:च्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारा,

वेळप्रसंगी आपल्या वेड्या मैत्रिणीची समजूत काढणारा,

वाकडं पाऊल पडताना मात्र खडसावून जाब विचारणारा,

यशाच्या शिखरावर आपली पाठ थोपटणारा,

सगळ्या मित्रांच्या घोळक्यात सैरभैर होऊन आपल्याला शोधणारा

आपण नसताना आपल्या आठवणीने व्याकूळ होणारा,

खरंच असा एक सच्चा, विश्वासू, जिवाभावाचा मित्र हवा,

जो आपणास 'माझी मैत्रीण' असं म्हणणारा...


Rate this content
Log in