आपल्याच हातात आहे...
आपल्याच हातात आहे...
आपल्याच हातात आहे...आपलं दिसणं आपल्या हातात नाही,पण आपलं असणं,आपलं वागणं आपल्याच हातात आहे..समोरच्या व्यक्ती ने त्रास दिला म्हणुन स्वत:ला त्रास करुन घ्यायचा,की "जाने दे वो भी क्या याद रखेगा म्हणुन इग्नोर करायचं, हे आपल्याच हातात आहे...कोणी आपल्या पुढे गेलं,म्हणुन त्याचा पाय खेचायचा कि जाऊ देत यार आपण पण त्या यशाच्या शिखरावर नक्की पोहोचु,असं म्हणत मेहनत करायची, हे आपल्याच हातात आहे...एखाद्याला मीच किती बरोबर अहे हे पटवुन देण्यात वेळ वाया घालवायचा, कि कधीतरी त्याची बाजु समजुन घ्यायची हे आपल्याच हातात आहे...
आपल्याकडून अमुक गोष्ट होणार नाही, म्हणुन प्रयत्न करने सोडुन द्यायचं कि,ती गोष्ट करुन त्यातुन काहितरी शिकायचं..हे आपल्याच हातात आहे...शेवटी काय तर आपण ठरवलं तर सगळचं शक्य आहे,स्वत:ला चांगलं बनवा,स्वत:वर प्रेम करा,स्वत:चा आदर करा, तर जग तुमचा आदर करेल..सूरुवात नेहमी स्वत:पासुन करा,कारण हे आपल्याच हातात आहे..