प्रेम म्हणजे प्रेम असतं...
प्रेम म्हणजे प्रेम असतं...


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
दुधाचं साखरेत विरघळणं असतं
वरणाला दिलेल्या फोडणीसारखं असतं
प्रकाश देताना, वातीसारखं जळणं असतं
दुसऱ्यांना आनंद देऊन स्वत: समाधानी होणं असतं
चातक पक्षानं पावसाची वाट पाहणं असतं
रुसलेल्या राधेची समजूत काढणं असतं
पहिल्याच नजरेच्या भेटीनं हृदय धडधडणे असतं
>
एकमेकांच्या कोवळ्या स्पर्शाने नसानसात भिनणं असतं
एकमेकांना सांभाळणं असतं
एकमेकांच्या भावना न सांगता उमजून घेणं असतं
अश्रुंची चव चाखणं असतं
दुर गेले तरीही मनामनांशी जोडले गेलेलं नातं असतं
शेवटी काय तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
कितीही नाही म्हटलं तरी सगळ्यांचंच सेम असतं...