Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Priyanka Chavan

Others

4  

Priyanka Chavan

Others

बाबा

बाबा

1 min
61


बाबा एक नाव असतं..

घरातल्या घरात दरारा आणि कडक शिस्तीचं गाव असतं..

आपल्या प्रत्येकाच्या मनात अशीच काहीशी प्रतिमा बाबाबद्दल असते

पण त्यांच्या मनात दडलेल्या प्रेमाची कोणालाही कल्पना नसते


छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांची आठवण येत नाही,

पण मोठं संकट आले की बापरे म्हटल्याशिवाय राहवत नाही..

बाबा असतो एक धागा, वातीसारखं स्वत: जळत

आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी एक जागा..


बाबा असतो तेव्हा कोणीही आपल्या घराकडे वाईट नजरेने बघायची करत नाही हिंमत,

पैशाने गरीब असला, तरी माणुसकीने असतो तो श्रीमंत..

कधीही न नाचणारा बाबा, मुलीच्या लग्नात मनमुराद नाचतो,

आपलीच मुलगी आता परक्याचं धन होणार म्हणून धाय मोकलून रडतो..


बाबासाठी त्याची मुलगी असते घराची प्रतिष्ठा, तर मुलगा असतो शान..

आपल्या गुणी मुलांमुळे वाढतो त्यांचा समाजातील मान

बाबांचं मन म्हणजे जसा नारळ, बाहेरून कडक पण आतून तेवढाच मुलायम..

घरातला कर्ता पुरूष आणि संकट झेलायला खंबीर कायम..


व्यक्त करा बाबांवर असलेले प्रेम आणि मारा एक घट्ट मिठी..

नाहीच जमलं हे तर लिहा त्यांच्यासाठी एक चिठ्ठी

शेवटी वेळीच भावना व्यक्त करणं महत्त्वाचं........


Rate this content
Log in