STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy Others Children

3  

Priti Dabade

Fantasy Others Children

जादूचा दिवा

जादूचा दिवा

1 min
208

मला सापडला जादूचा दिवा

म्हटलं घासून तर पहावा


जादूच्या दिव्यातून निघाली अचानक परी

थोडी भीती दाटली मनात खरी


वाटत होतं खरंच भारी

आता पूर्ण होतील स्वप्नं सारी


परी म्हणाली काय हवं

दाखव काहीतरी जरा नवं


मी पोहोचले स्वप्नांच्या दुनियेत

परीच्या बसून अलगद मिठीत


हिरे, माणिक मोती

अजून गोष्टी किती


मी स्वप्नदुनियेची सैर केली

डोळे चोळताच सकाळ झाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy