स्वप्नपरी
स्वप्नपरी
माझ्या स्वप्ननगरीत रमते मन थाटात
पाहता स्वप्नपरी कडे बाग फुलांनी फुलवतात
रंग-बिरंगी जादूची दुनिया आहे फुलांची
फुलपाखरू बनुन मैत्री होई सगळ्यांची
हिरवळीत माझे मन लोळी मनसोक्तपणे
आनंदाचे सुखी क्षण स्वप्नपरीस ह्या भेटणे
मंद वाऱ्याची झुळूक अंगावरी शहारा
डोळ्यात माझ्या सुंदर नयनरम्य नजारा
पक्षांची किलबिलाट मधुर कानात गायी
उंच उंच घेता झोका पारंब्याचा मला झुलवी
