उन्हाळा
उन्हाळा
1 min
224
किती सुंदर असायचा
बालपणचा उन्हाळा,
वाटे पाण्यात टाकला वाळा.
भावंडाना भेटायचा सोहळा |
आजोळी जायची घाई,
बाहुला बाहुलीची लग्नसराई,
उन्हात खेळायला जागेची टंचाई,
मागच्या अंगणात आमची सरबराई |
पसाभर आंबे आगळे वेगळे,
खावे कसे, ढोपरा पर्यंत ओघळे
खाण्याची मजा काळात गडप झाली,
जशी आगगाडी स्टेशनातून निघाली |
तेव्हाच्या उन्हाळ्यात न्हवता,
संस्स्ट्रोक, न्हवती हिट वेव्ह,
खुल्या चांदण्यात उघड्या अंगणात,
चाले गप्पा गोष्टींची देवघेव |
परतीच्या वाटेवर ऊर दाटून येई,
नवीन वही पुस्तकांची ओढ पुढे नेई,
डोळे पुन्हा येणाऱ्या,
उन्हाळ्याची वाट पाही, वाट पाही..
