STORYMIRROR

Kavita Sangras Kanherikar

Inspirational Others

3  

Kavita Sangras Kanherikar

Inspirational Others

आई

आई

1 min
392

आई तुझी आठवण 

मायेच्या शीतल वनात 

जशी चंदनाची साठवण 

वसलीस तु मनामनात 


तुझ्या हातचा मेतकूट भात 

पायाचे फुटलेल्या भेगाना 

तुझा मलमाचा हात 

सोपे नाही जीवन तुझ्याविना 


आमच्या अभ्यासा साठी जागरण 

डोळ्यात आस आमच्या प्रगतीची 

आमच्या सुखासाठी वणवण 

नाही बरोबरी तुझ्या व्यक्तिमत्त्वाची 


 सुखात हसलीस, आपलस करून 

 तुझ धैर्य, तुझी चिकाटीच वंगण 

 दुःखातही हसलीस पदरात घेऊन 

 लिहायला लेखणीला अपूर्ण तारांगण 


गेलीस गणेशोत्सवाच्या दिवशी 

थांबवून गणेशाला क्षणभर दारी 

डोळ्यादेखत संपलीच कशी 

वाटे देवालाही पडली तुझी जरूरी 


माझ या जगात असणं, हसणं 

माझा प्रत्येक श्वास तुझा ऋणी 

नाही मुक्त माझ्या शरीराचा कणकण 

आठवणीत ओवायचे मणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational