STORYMIRROR

Kavita Sangras Kanherikar

Others

3  

Kavita Sangras Kanherikar

Others

जीवनातील इंद्रधनुष

जीवनातील इंद्रधनुष

1 min
262

कुठे गडद कुठे फिके,

रांगोळीचे रंग |

जशे आकाशात,

उडणारे पतंग |


चढ उताराचे जीवन |

किती लोट धुळीचे कुठेतरी,

चाचपडणारे खेळ नशीबाचे |

कुणास ठाऊक किती अथांग |

जशे इंद्रधनुष रंग बेरंग |


काटे कुटे ऊन पाऊस |

कती सोसले किती टोचले 

सारे काही शरीराचे चोचले |

काही वाटले तुरुंग काही वाटे सारंग |

जशे मनीचे भाव निसंग |


कधी आठवणींची 

डोळ्यवर पसरली चादर |

कुठे अंधूक तर कुठे आरपार |

अश्रुनी वाट करून देणारे,

पापण्यांचे तरंग,

भिजवून टाकणार अंग अंग |


Rate this content
Log in