फुलपाखरू
फुलपाखरू
लहानपणी आई मला, माझं फुलपाखरू म्हणायची
तेव्हा समजला नाही बालवयाला त्याचा अर्थ.
आता दिसतात मला ,माझे कित्येक रंग,
जे खुणावतात मला ,आणि दुनावतात माझा उत्साह .
भिर भिरते मी या दुनियेत ,आणि रंगून जाते नव्या रंगात.
रंग मैत्रीचे, रंग नात्याचे,संग मस्तीचे, संग प्रेमाचे.
आज काल मात्र हे फुलपाखरू ,जरा नाविण्याने भिर भिरतं.
उठता, बसता , चालता , बोलता,त्याला नवनवीन गीत स्फुर्त.
फिरायला आता बाग पुरत नाही
अस घडलंय काय, त्याला ही स्मरत नाही.
फुलपाखरू आता वयात आलंय,दुनियेच्या रंगात बेभान झालंय.
जगण्याचा ते आस्वाद घेतंय
एकेक पाऊल पुढे जातंय,पण आई,
उडताना शब्द तुझे मला सदैव लागतात स्मरू,
जगाला वाटेल जेव्हा आकर्षण,
तुझ्या पंखांचे आणि रंगाचे.
तेव्हा मात्र रंगासोबत पंखालाही जप
अन्याय होऊ देऊ नको बाळा,
आणि दिसलाच कुठे तर,
कधी राहू नको गप्प,कधी राहू नको गप्प.
