STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

आईची माया

आईची माया

1 min
329

गोड अमृतासमान

आहे आईची माया

धाव घेतसे संकटी

मिळे थंडगार छाया....!!

आभाळाएवढी माया

दुधावरचीच साय

येते काळीज चाटून

बाळ म्हणतो रे माय....!!

कसे आईच्या कुशीत

सुख स्वर्गाचे पाहिले

चिमुकल्या बाळासाठी

कष्ट सारे रे वाहिले......!!

गोड वात्सल्य आईचे

मिळे नशिबवानाला

नसे अर्थ आईविना

आपुल्या रे जीवनाला....!!

आई चाहूल लागता

सोसे कळाचा मार

गोड वात्सल्याचा झरा

पाजी अमृताची धार.....!!

मज ना आईची माया

आठवते नित्य आई

अचानक तू जाण्याची

कशी केलीस ग घाई.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational