स्वराज्य रक्षक संभाजी राजे
स्वराज्य रक्षक संभाजी राजे
करू साजरी जयंती आज
होऊनी नतमस्तक तुम्हास
या शुभ मंगलमय दिवशी
शूरवीर राजे लाभले आम्हास
आई सईबाई पोटी जन्मले
तेज रूप तुमचे कीर्ती महान
ताणें लेकरू संभाजी बाळ
दूरदृष्टी बुद्धी चातुर्य बलवान
धर्म लोक हीत *राजा संभाजी*
वाऱ्या पेक्षाही तेज तलवार
लेकीबाळी पर-स्त्री आई समान.
हीच शिकवण आम्हावर....
एकच राजा सोळा भाषा अवगत
युद्ध झींकुनी नाही झाले पराजय
गनिमी कावा करण्यात तरबेज
भगवा फडकला मिळवूनी विजय.
आई सईबाई पत्नी येसूबाई
प्राणप्रिय आमचे आबासाहेब.
आई विना आम्ही पोरखे
सांभाळ आम्हा आजी मासाहेब
चौदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ
शत्रु किती मोठा वार छाताडावर
राजकारणात नाही धरला हात
कट्टर छातीचा वार नाही पाठीवर
अनेक मावळे शामिल एकनिष्ठ
भटकुणी रानोमाळ खाण्या स्वाद
कमी वयातच स्वराज्य निर्माण
आई जगदंबानी दिला आशीर्वाद
शत्रूसमोर नाही झुकले नमले हरले
यातना होऊन सदा रयतेचा ध्यास
अंगाची लाहीलाही तुकडे लचके
दिला प्राणाचा अखेरचा श्वास
