आधार
आधार
आजवर राहिले खंबीर
काढुनी आयुष्य थकून गेले.
नाही मला आज कोणाचा धीर
माझ्याच मुलांनी घराबाहेर केले.
दाटून आले डोळ्यातून पाणी
झाले मी पतीविना पोरकी.
पोटासाठी दर् भर फिरते
आज येथे उद्या येथे सारखी.
जीव कासावीस झाला आता
वाट पाहिली मी खाण्यापिण्याची.
पूर्ण दिवस निघून गेला
भास झाला मला देवदूत येण्याची.
धावूनी देवदूताने दिले अन्नपाणी
थकलेल्या भुकेलेल्या या आजीला
थकून भागून झाला खूप आनंद
दिला खूप आशीर्वाद त्या जीवाला
