अश्रू थांबता थांबेना
अश्रू थांबता थांबेना
दीन दुबळ्यांची व्यथा
कोणास नाही कळेना..
निसर्गाचा कोप आहे
आजार का हो थांबेना....
अश्रू थांबता थांबेना!!१!!
वैराग्य जीवन बनून गेले
पाच- दहा लाख घालुनि..
प्राण काय वाचेना
दिनरात्र बेडवरच पाहुनी....
अश्रू थांबता थांबेना!!२!!
नाही कुणाचा ठाव ठिकाणा.
कसला आला हा अट्टाहास..
आजवर केले पुण्य पाप
नाही मिळाला मोकळा श्वास....
अश्रू थांबता थांबेना!!३!!
कसला धरला हा अबोला
नाही काळजी हो घेतली..
कोण आणेल का संजीवनी
जणू यमदूतांनेच हाक मारली....
अश्रू थांबता थांबेना!!४!!
नका करू निसर्गाची बरोबरी
तोे आहे महाभयंकर रोग..
बाहेर पडूनी नका मोडू कायदा.
मृत्युमुखी पडत झाली आग....
अश्रू थांबता थांबेना!!५!!
