देवा कुठे गेला
देवा कुठे गेला
कुठे गेला भाऊ
सांग आज मला
देवा कुठे गेला
कसा घात झाला
भाऊ सांग जरा
शोधू कुठे तुला
देवा कुठे गेला
आठवण मला
स्वप्नात देखील वाटलं नव्हतं
जणू आभाळच दाटून आलं
तुमच्या सारखे कोणीच नाही
फोटो पाहून डोळे भरून आलं
शोधू कुठे तुला मी भाऊ
सांगायला हव तू मजला
देवा कुठे घेऊन गेलास भावाला
कसला हा नियतीने घात केला
क्षणोक्षणी तुमचीच आठवण
नजर घराला लागली कुणाची
चेहरा गोजिरवाणी सतत हसत
ताळमेळ झाली आमच्या मनाची
जाण्याआधी नाही दिसलास
कसे सांगू या जिवाच्या देहाला
आधीच निघून तू गेलास
कसं सावरु मी स्वताला
निसर्गाचाच जर खेळ असेल
तर मी काय बोलू देवा
घराला आमच्या नजर लागली
का दूर घेऊन गेलास देवा
