STORYMIRROR

Anagha Kamat

Action

4  

Anagha Kamat

Action

उठ माणसा

उठ माणसा

1 min
201

उठ माणसा हो जागा 

केव्हां बाबा तूं उठणार ? 

व्यर्थ करतोस जिवाचा त्रागा 

झोपून किती वेळ राहणार ? 


येत नाही गेलेली वेळ 

वेळ वाया का घालवतोस ?

सुखदु:खाचा असतो खेळ 

ताळमेळ कसा बसवतोस? 


काम कर बाबा काम कर 

बसून नाही तूं राहूं शकत 

कष्ट करून तूं पोट भर 

झोपून राहूं तूं नाही शकत 


संसार किती असतो छान 

डोळे उघडून बघ जरा 

जास्त कमाईचे द्यावे दान 

दानी असतो माणूस खरा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action