STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational

माणसाने कधी विचारू नये जात...

माणसाने कधी विचारू नये जात...

1 min
277

माणसाने कधी विचारू नये जात

तिथेच तर होतोय माणुसकीचा घात....!!


आपण सारी एकाच परमेश्वराची लेकरं

ना कोणी धनी ना कोणी इथं चाकरं.....!!


सर्वाच्या धमन्यातील रक्त लाल आहे

फक्त कुणाची झोपडी तर कुणाचा महाल आहे...!!


उचनिच, भेदभाव देशाला लागलेली कीड

अन्यायाविरुद्ध बोलायला का येत नाही चीड...!!


माणसातली माणुसकीच खरा धर्म आहे

सत्याच्या मार्गाने चालणे हेच खरे कर्म आहे...!!


जातपात, धर्मपंथ नका विचारू कधी

माणसातला देव ओळखावा आधी.....!!


साधी राहणी उच्च विचारसरणी सांगून गेले महंत

माणसात पहावा खरा देव सांगून गेले संत...!!


देशसेवा,चांगले कर्म हीच खरी पुजा

एकाच परमेश्वराची लेकरं नाही कोणी दुजा...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action