STORYMIRROR

Vighnesh Warang

Action

4  

Vighnesh Warang

Action

सुंदर हा पर्यावरण👌

सुंदर हा पर्यावरण👌

1 min
739

परमेश्वराची सुंदर करणी,

नांदतो या पर्यावरणी।

हिरवी झाडे,उंच डोंगरे,

आणिक खळखळ पाणी।।


चहूदिशांनी वनसंपत्ती,

पर्यावरणा घेरती।

सुंदर स्थळे अन सुंदर दृश्ये,

चित्त्तास मोहुनी टाकती।।


देवाचा हा वर सुंदर,

आम्हा जीवांसाठी।

पृथ्वीवरी उतरला स्वर्ग,

निसर्गा सोबत देण्यासाठी।।


पर्यावरणाच्या सानिध्यात,

प्रसन्न होते चित्तवृत्ती।

झाडे-झुडपे,डोंगर,नद्या,

हीच आपुली खरी संपत्ती।।


न कंटाळता नद्या वाहती,

न विसरता ऋतू येती।

फळे-फुले झाडांवर बहरती,

नित्य-नेमे सेवा करती।।


पण काळानुसार सगळं बदललं,

माणसानेच पर्यावरणाला फसवलं।

तोल ढळतोय वातावरणाचा,            

ऱ्हास होतोय पर्यावरणाचा।।


जंगलतोड,प्रदूषण आणिक

निष्काळजीपणा।

शिकवीत आहेत धडे,

पुन्हा पुन्हा आपणा।।


नकोत तोडू राने,

पुन्हा फुलवा वने।

प्रदूषणाला घालून आळा,

व्हा आता शहाणे।।


पर्यावरणाला ढासळून,

काय मिळणार?

आपुला अंत ,

आपणच करणार।।


झाडे लावा,पर्यावरण जगवा,

वसुधेला बनवा हरितश्यामल।

यातच आहे हित आपुले,

पर्यावरणाला पुन्हा बनवूया निर्मल।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action