STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational

जागतिक आरोग्यदिन

जागतिक आरोग्यदिन

1 min
222

आपुल्याच हाती

आपुले आरोग्य

चांगल्या सवयी

वळण ते योग्य....!!


लवकर निजे

लवकर उठे

प्रभातसमयी

फिरा ना पहाटे...!!


नियमित धुवा

सदा स्वच्छ हात

दोन वेळा ब्रश

स्वच्छ दिसते दात....!!


बाहेर जाणे टाळा

मास्क लावा सदा

हात मिळवणे

टाळा तीच अदा.....!!


बाहेरचे खाऊ

मुला देवू नका

कोरोनाला घरी

उगा बोलवू नका.....!!


नित्य करा व्यायाम

नित्य करा योग

आपुल्याच हाती

आहे आपले आरोग्य...!!


उघड्यावर बसू नका

करा शौचालयाचा वापर

जबाबदारी बाळगा थोडी

नको शासनावर खापर....!!


चांगल्या सवयी

लावून घ्या स्वत:ला

नाहीतर तर मुकशील

मानवा जगण्याला.....!!


एक दिवस मारू बोंबा

फरक नाही पडणार

जे होईल ते पाहू

असं नाही घडणार.....!!


कच-याची विल्हेवाट लावा

जपा इतरांचे आरोग्य

सॅनिटायझर वापरा

चांगले राहील आरोग्य....!!


नियमितपणे हात धुवा

स्वच्छतेच्या सवयी लावूया

आरोग्य दिनाची महती

काव्यामधूनी ऐकुया....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action