सूर्यरत्न..
सूर्यरत्न..
धाव गडातून मावळ्या वणवा पेटला.
शत्रू भरे मोरखे घाव,चारा लुटला.
सूर्य पेटण्याआधी पेटवून येतू त्याला.
भर मनगटी ध्येय निश्चिताचे कर्म हे तुझ्या वाट्याला
शत्रूच्या हाती दिवा नियतीचा
दिवस होहील भेहाल वार त्याचा
सांज राती कापत जा तू, घेऊन सहारा मशालीचा.
धाव गडातून मावळया वणवा पेटला.
शिवजोतीची जोत भडकली.
वैरी अंधारची भीती वाढली
कडाडली ही मावळ वस्ती,
झेप डोंगरी झेप कड्याकपारी.
सर्य मस्तकी विजय स्वरी.
धाव गडातून मावळया पेटे तोफ ललकारी.
इतिहास सांगतो
रामशेज, अजिंक्य हे उदाहरण
विस हजारची फौंज घेऊन आला फतेहखान.
नमस्तक होहून, गेला हारून.
मावळ्यांनी,
विजयाचे बांधिले तोरण.
अंधारात उजळले कणखर मातीचे सूर्यरत्न.
पाहुणी पराक्रम त्यांचा सूर्य ही जाई दिपून.