माझी सायकल
माझी सायकल
1 min
333
दोन चाकाची माझी सायकल
फिरवत राहते मारून पायडल
ना लागे पेट्रोल ना कोणते इंधन
कोठे ही फिरा ना कोणते बंधन
चालवायला सोपी नि ठेवायला सोपी
खांद्यावर रेडिओ नि डोक्यावर टोपी
पहिल्यांदा कैंची मग सीटवर बसून
तरबेज झालो की डबल सीट घेऊन
सायकल शिकतांना मजा यायची
एकदा पडल्याशिवाय कसे शिकायची
ना ध्वनी प्रदूषण ना हवेचे प्रदूषण
सायकल होते तेव्हा घराचे भूषण
