अगं अगं खारुताई...
अगं अगं खारुताई...
अगं अगं खारूताई
काय सांगू तुला बाई
तु आहे डोक्याने हुशार
पण काही घटनेत तुझी किम्मत नाही.....
तुझी गोडी जगात वाही
तुझ्यासारखी कोणी शांत नाही
दिसतेस जणू चंद्र ताई
पण काही माणसं तुला पुन्हा पुन्हा त्रास देई.....
तु दिसतेस ठाई ठाई
झाड डोंगर नद्या तुझीच पुण्याई
तुझी मदत वाया जात नाही
तूच आहे अहिंसेची आई......
तुझा गोडवा रामकथेची पुण्याई
खारीचा वाटा म्हण तिथूनच येई
तुझ्या हृदयापुढे पूर्ण जग वाहून जाई
तू आहे लहान पण प्राण्यांची खरी मोठी ताई......
तुझ्या दानाची ख्याती सर्वर होई
तूच आहे पुण्य आणि तूच आहे आई
तुझ्या आणि मनुष्याची मैत्री सोपी नाही
पण तुझ्यावरचा विश्वास कधी वाया जात नाही.
