STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Children

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Children

माय

माय

1 min
242

भर उन्हामध्ये राबते 

माझी कष्टाळू माय 

प्रेम आहे तिझ जसं 

दुधावरची साय 


काट्याकुपाट्यातून चालते 

पोटासाठी अनवाणी 

भराया पोटाची खळगी 

केलं तीन रगताच पाणी 


तान्हा असताना आम्हाला 

माझा बा सोडून गेला 

सगळा घराचा बोजा 

तिच्या खांद्यावर आला 


दिसरात लेकरांची काळजी 

तिझ्या वेड्या मनी 

कशी सांगू माझ्या मायची 

करून कहाणी 


खुलतो तिझा चेहरा 

बघून लेकरांची खुशी 

खरच मऊ लागते 

मायच्या प्रेमाची उशी 


फाटके कपडे आणि 

मोडका संसार तिझा 

स्वतः उपाशी राहून 

सांभाळ केला माझा 


स्वर्गाहून गोड 

तिझ्या मायेची उब 

थिटे तिच्या पुढे 

सगळ्या ऐशोआरामाचं सुख


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy