STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Inspirational

कालची संध्याकाळ

कालची संध्याकाळ

1 min
255

कालची संध्याकाळ खूपच खायला उठली

आकाशात भगव्या रंगाची उधळण बघायची राहिली..


ढोल ताशा पथक वादक यांच्या आवाजाची कमी जाणवली

त्यानिमत्ताने होणारे महाराजांच्या अश्वारुढ मूर्ती पहायची राहिली..


लहान शिवभक्त छोटेसे मावळे यांचे भाव पाहायचे राहून गेले

सगळीकडे असणारे शिवमय वातावरण शांत होताना दिसले..


आसमंत व्यापून टाकणारा झेंडा त्यास वंदन करायचे राहिले

प्रत्येक वादक त्यांच्या कलेचा आस्वाद घ्यायचे राहून गेले..


थिरकणारे पाऊल ती बिनधास्त होणारी गर्दी ही हरवली..

तो होणारा जयजयकार तो सुरमय आवाजाची आठवण आली..


काल प्रत्येक जण दरवर्षी होणाऱ्या उत्साहाला सगळी मुकली

शिवाजी महाराजांची दिमाखात निघालेली पालखी पहायची राहिली


Rate this content
Log in