विरह
विरह
1 min
300
तुझ्या आठवणींचा
विरह सरता सरेना
आई तुझ्या आठवणीत
रात्र काही संपेना
विरहाच्या सोबतीने
आठवणीत जगते मी
तुझ्या काही आठवणी
साठवून बघते मी
आठवणीने माझ्या
पापण्या होतात ओल्या
मनातून जेव्हा माझ्या
भावना उफाळून आल्या
भरून डोळे आले
आईच्या जाण्याने
आठवणीने माझे
डोळे चिंब ओले पाण्याने
सांग देवा असे वागून
तुला काय मिळाले?
आईला माझ्या नेतांना
काहीच कसे नाही वाटले?
किती करत होती
तुझी ती भक्ती
तरीही तुझ्यात नव्हती
तिला वाचवण्याची शक्ती
विश्वासाने तुला ती
मानायची श्रद्धास्थान
तरिही तिच्या भक्तीचा
तुला ठेवता आला नाही मान
मान्य आहे ही वेळ
प्रत्येकावरच येणार
आलेला प्रत्येक जीव
एक न एक दिवस जाणार
हे ऐकल्यावर माझ्या
विरून गेल्या संवेदना
ज्यांना आई नाही त्यांच्याविषयी
जाग्या झाल्या प्रेम भावना...
