STORYMIRROR

Sonal Nimsatkar

Others

3  

Sonal Nimsatkar

Others

आई

आई

1 min
304

आई रूपाची ती खाण

आई जगण्याची शान


आई मातीतलं बियाणं

आई सौख्याचं निशाण


आई मायेचा पाझर

आई दह्यातील साखर


आईची पिले सुरेख

तिच्या कर्तृत्वाचा आलेख


तिच्या कर्तृत्वाची ठेवा जाणं

तुम्ही व्हाल जगी महानं


आई जगात आहे थोरं

जणूकाही नाचणारा मोरं


तिची बनूनी गुणी पोरं

मानुया आईचे आभारं


आई विलक्षण आभास

तिला पिलांचा असे ध्यास 


आई मायेचा सागरं

आई दयेची घागरं


आई करते जगण्याच रान

तिच्या उपकारांची ठेवू जाण


आईविना श्रेष्ठ मजला भासत नसे कोणी

आईविना भिकारी म्हणे तिन्ही जगांचा स्वामी


तुझ्याविना जगण्याचा विचारच करवत नाही

तु नसलीस तर हे जगच असणार नाही


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

More marathi poem from Sonal Nimsatkar

झुळूक

झुळूक

1 min படிக்க

विरह

विरह

1 min படிக்க

आई

आई

1 min படிக்க