आमची मांजर
आमची मांजर
मांजर आमची मोठी शहाणी
मांडीवर माझ्या येऊन बसते
कसलाही आवाज झाला तर
लगेच कान आपले टवकारते
अंग आपलं चाटल्यावर
माझे पण हात चाटते
खरखरीत जीभ लावल्यावर
मध्येच एक चावा घेते
मारायला हात उगारल्यावर
आपला पण हात उगारते
मला हंसूं आवरेना तोवर
गोलाकार होऊन बसते
बसल्यावर तिथेच डोळे मिटते
आणि गाढ झोपून जाते
उठल्यावर नाहीं उठत
नखं मात्र चटकन टोचते
अभ्यासाला बसल्यावर मी
पुस्तकावर येऊन बसते
पिटाळून तिथून लावले तरी घंघं
परत माघारी वळते
लाडिक त्रास देते मनी
पण फार कौतुक वाटते
अशा माझ्या मनीला बघून
देवाचे आभार मी मानते.
