STORYMIRROR

Varsha Kendre

Classics

3  

Varsha Kendre

Classics

आजीचा पदर

आजीचा पदर

1 min
343

 ज्येष्ठांचा सहवास

 सुखाचा प्रवास

 आनंदास उधान

 आधार वाटे जीवास


 पदराच्या चिंधीत

 ओली जखम बंदिस्त

 पुन्हा नको पडाया

 मागणी राही रास्त


 जेवावया बसता

 वारा घाली पदर

 नातवंडांसाठी आजी

 भासतसे कणखर


 चेहरा सुकता

 काढी नजर पदर

 त्या प्रेमळ नजरेस

 कशाचीही नसे सर


 पदराखाली झाकून

 असे आजीची भाकर

 कष्ट करता शेतात

 भाकरी संपे भरभर


 होई पूजा सुगडयांची

 ओटी भरली पदरात

 आजोळी जाता त्या क्षणी

 वाट पाहे आजी दारात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics