पोळा सण
पोळा सण
आनंदाचा पोळा सण
उत्साही कृषक असे
घेऊनया बैल हाती
सजवण्या व्यस्त दिसे -1
अंगावरी झुल छान
गळ्यामध्ये शोभे माळ
पैंजण घालून पायी,
शेंदुराने सजे भाळ -2
थाट मांडू नैवेद्याचा
पुरणपोळीचा मान
रांगोळी नक्षीची काढू,
दारी बांधून तोरण -3
सालभर कष्टोनिया
धन्याप्रति प्रामाणिक
विश्रांतीवेळ बैलाचा
आज कृतज्ञ कृषक -4
सजोनिया बैल सारे
मारी फेरे मंदिरास
आकर्षक त्या दृश्याने
मोद मिळतो जनास -5