घे उंच भरारी
घे उंच भरारी
बळ पंखातले
दाखव जगास
घे उंच भरारी
हर्ष दे मनास
नाही तु अबला
आहेस सबला
खंबीर बनून
सोड तू गर्वाला
नभी उडताना
पाय असू देत,
ते जमिनीवर
रहा संस्कारात
जप एकतेस
सकारात्मकता
बानव अंगात
नको ती दुष्टता
जग निर्माती तू
रहा तेजोमय
कर्तृत्वाने तुझ्या
मिळव विजय
