कन्यादान
कन्यादान
रित कन्यादानाची
पिढ्यानपिढ्या चालतसे
डोळा माता-पित्याच्या
पाणी येत असे
सुशिक्षित कन्या
दोन्ही घरा पुढे नेई
संस्काराची तिजोरी
संसारात कामी येई
कमी वयात कन्यादान
नये कधी करू
दोन जीवांचा मिलनास
कायद्यास स्मरू
भाग्यवान माता पिता
ज्यांच्या भाळी कन्यादान
सुसंस्कारी कन्यामुळे
ताठ राही त्यांची मान
