उठ पंढरीच्या राया
उठ पंढरीच्या राया
उठ पंढरीच्या राया
आलो दर्शनास तुझ्या
ओढ तुझी दिन रात
साद घाल मना माझ्या-1
सुरू काकड आरती
माहे कार्तिक मासात
मूर्ती तव बहुगोड
साठवली हृदयात-2
भक्तां संगे रमतोस
कार्य त्यांची करतोस
मम स्वप्नी वसोनिया
कधी दर्शन देतोस?-3
रोज अभिषेक होई
दही दूध लावूनिया
पंढरीच्या पांडुरंगा
मज लावली रे माया-4
वस्त्र, नैवेद्य अभंगे
नीत तुला गाऊनया
अर्पियेल्या फुलमाळा
वंदुनिया रे तुजला-5