STORYMIRROR

Bharati Sawant

Horror

3  

Bharati Sawant

Horror

आजचा विषय - भय

आजचा विषय - भय

1 min
318

किर्रर्र काळोख नभी दाटला 

दूरवर दिसली एकच झोपडी

चालून चालून थकलेलेच पाय

व्याकूळ तहानेने कोरड नरडी


भयाण काळोखात एकलीच मी

झोपडीतून झळकला एक दिवा

आला माझ्या जीवात जीव जरा

झोपडीत समोरच टांगलेला तवा


भिऊन चरकलेच माझे तनमन

तव्यामागे चमकलेच लाल डोळे

रोम-रोम जागे अंगावरही शहारे

पायांमध्ये आले मणमणाचे गोळे


टांगलेले उलटे रक्ताळलेले शरीर 

कानातून अतितप्त अग्निज्वाला

ओरडताना माझी बोबडी वळली

थंडीतही अंगाला या घाम फुटला


कानाजवळ हळूच आवाज आला

भिऊ नकोस बाळा मी हडळ हाय

काय हवेय भूक लागली का तुजला 

झोपडीत माझ्या तुझे लागलेत पाय


रक्ताळल्या तोंडातल्या उग्र दर्पात 

घाणीने मळमळुन केली मी उलटी

समोर पाहू जाता होते भयंकर दृश्य

लटकल्या प्रेताची प्रतिमा ती सुलटी


पळायला गेले तो आवाज घुमला

गरमच जेवण सर्व भाजीही ताजी

जखडून गेले जणू दोन्ही माझे पाय

रक्ताची खीर नि कलेज्याची भाजी

    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror