STORYMIRROR

Komal Gundu huddar

Abstract

4  

Komal Gundu huddar

Abstract

आज म्हणे फार्मर्स  डे

आज म्हणे फार्मर्स  डे

1 min
247

शेतकरी होणं

साधं नाही हो काम

एक दिवसाच तर नक्कीच नाही...

घाम गाळावा लागतो 

वर्षभर राबावे लागतं

ऊन,पाऊस,थंडी विसरून

आज म्हणे फार्मर्स डे 


पाऊस आला तर आला 

नाही तर,

घामानेच शेती करावी लागते

ते ही करून बियाणं 

उगली नाहीत तर 

पहिले पाढे पंचावन्न

अन् आज म्हणे फार्मर्स डे 


चुकून काळ्या ढगांची 

कृपा झालीच 

धान्य उगवून आलेच तरी

हातात येईल याची 

शाश्वती नसतेच 

अन् आज म्हणे फार्मर्स डे 


इकडून तिकडून 

उसन, उधार घेऊन

शेतकरी राबत असतो

मिळालेल्या मूठभर 

धान्याला विकून 

फेडतो कवडीकवडी

अन् आज म्हणे फार्मर्स डे 


सोन पावलांनी, लक्ष्मी रूपांनी

वाजत गाजत आनंद पसरवत

धान्याच्या राशी घेऊन

राम लक्ष्मणाच्या साथीने 

सवारी येते वर्षभराच्या धनाची

स्वागत होते धूप आरती ओवाळून 

अन् आज म्हणे फार्मर्स डे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract