STORYMIRROR

Komal Gunduhuddar

Others

1.0  

Komal Gunduhuddar

Others

जगू तरी कशी मी तुझ्याशिवाय......

जगू तरी कशी मी तुझ्याशिवाय......

1 min
2.7K


विचार केला आता

जगावं तुझ्याशिवाय

पण इतकं हलकं नाही आपलं प्रेम

खरच इतकं सोपं असेल का?

तुला विसरणं.

तुच सांग ना रे मला कशी तरी जगू

मी तुझ्याशिवाय.

दोघांनी एकत्र घेतलेल्या

त्या श्र्वासांना.

विरहाच्या भीतीने दिलेल्या

त्या हुंदक्यांना.

दोघांनी एकत्र बघितलेल्या

त्या स्वप्नांना.

एकत्र घालवलेल्या

त्या क्षणांना.

एकमेकांत गुरफटलेल्या

त्या मनांना.

हे सोपं आहे का सारं विसरणं?

या सर्वांना आपलं प्रेमच तर आहे

साक्ष म्हणून.

सांग आता तुच कशी मी

सोडवू तिडा हा प्रेमाचा

सांग ना रे तुच कशी राहू

मी तुझ्याशिवाय..

कुठेच मन रमत नाही

भरकटत जातं तुझ्याच

शोधात फक्त

पण सापडत काहीच नाही

तुझाच ओला भास फक्त

फुलणार्‍या प्रेमात या

माझी आस ही तूच फक्त

सांग ना रे वेड्या मला

कशी तरी जगू

मी तुझ्याशिवाय.

कशी तरी जगू

मी तुझ्याशिवाय.


Rate this content
Log in