ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

55
काळ्या या पावसाळी
ढगांना सांगणं आहे
आतुरतेने वाट तुझी
आंगण पाहतो आहे
बालचमू आकाशाकडे
नजर रोखून पाहतो आहे
अंगावरचा शहारा सुद्धा
पावसा आधीच शहरतो आहे
वारा पावसाची चाहूल
हळुवार देतो आहे
पक्षांचे थवे इकडून
तिकडे फिरतो आहे
झाडा झुडपांनी सुद्धा
झटकली धूळ आहे
जय्यत तयारीत यांच्या
ओढ पावसाची आहे...