STORYMIRROR

Komal Gunduhuddar

Others

2  

Komal Gunduhuddar

Others

हरवली ती

हरवली ती

1 min
13.8K


हळदीने माखलेले कोवळे तिचे अंग

रंगलेल्या मेहंदीचा वास 

नवा नवा सहवास थोडा

हवा हवासा भास

हळुच लाजणं तिचं

गालात हसनं

हळुच सावरुन चालणं

पाऊल जपून टाकनं

मनमोहक तुझं बदन

नवा अनुभव

हाती हिरवा चुडा

खणखण करती

सुगंध दरवळे सर्वत्र

वेगळाच अत्तर

पायी पैंजन, जोडवी

मंगळसूत्राचा थाट

चुकवून नजर लोकांची

हळुच तिचं काही सांगनं

अनोळखी  लोकांत

अनोळखी वाट

पण गर्दीतल्या माणसांत

जणू कुठे हरवली ती


Rate this content
Log in