STORYMIRROR

Komal Gundu huddar

Inspirational

3  

Komal Gundu huddar

Inspirational

स्त्रीत्व

स्त्रीत्व

1 min
213

विसरून साऱ्या जगाला, आठव फक्त स्वतःला

गुंतून जा फक्त तुझ्यातल्या स्त्रीत्वात,


आठवू नकोस दुःखाने ग्रासलेले त्रासलेले जग,

रमून जा फक्त त्या फुललेल्या फुलात,


फुलाप्रमाणे फुलून जा, पाखराप्रमाणे उडून जा

स्त्रीत्वाचं अनमोल जीणं जागून जा ,


कितीही झाले कष्ट तरीही जगणं विसरू नकोस

तुझ्या जगण्यातून दाखवून दे जगणं म्हणजे काय?


समजू नकोस कमीपणा करू नकोस मी पणा

कर्तृत्वातून जाणवून दे अर्थ स्त्रीत्वाचा 


स्वतःवर प्रेम करून बघ, स्वतःसाठी थोडं जगून बघ

स्वतःवर विश्वास ठेवून बघ बघ जीवन बदलते का?


फक्त चूल आणि मूल नको करुस पड बाहेर आता

मानानं जग, स्वाभिमान बाळग एकाच जन्मात,


मिळव खांद्याशी खांदा, बरोबरीने वाटचाल कर

उंच उंच भरारी घेत मुलांना सुद्धा सक्षम कर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational