आई
आई
आई
आई कल्पवृक्ष मायेचा
आई अमर पिंपळ छायेचा
आई हेच तीर्थक्षेत्र जगी
आईच ध्रुवतारा नभी
आई जगण्याचे भान
आईच जीवनाची शान
आईआनंद मंगल माय
तेहतीस कोटी देवांची गाय
आई सखी मैत्री मोकळी
काळजातील तेवाती दिपकळी
आई सारखे दैवत दुसरे नाही
मायेचे नाव आई श्रद्धेचे गाव आई----!
- विवेक द.जोशी
