STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational Others

4  

Gajanan Pote

Inspirational Others

||आई मराठी||

||आई मराठी||

1 min
307

तुझ्याचमुळे ग्रंथ समजले

तुझ्यामुळे गीतेचे रहस्य उमगले

तुकारामांचे अभंग रचले

एकनाथांचे भारुड कळले||


तुझ्यामुळे भक्तिमार्ग दिसला 

भाव मनाचा व्यक्त तो झाला

माय मराठी तूच जगण्यास अर्थ दिला 

ह्रदयात तुझाच ठसा उमटला||


 शब्दांचा तुझ्या खेळ न्यारा

जणु वाहे अमृताचा झरा

काना,मात्रा वेलांटी श्रृंगार खरा

विराम चिन्हांची आहे तुला साथ जरा ||


माय मराठी पुढे नेऊ तुझ्या संस्कृतीचा वारसा

तुलाच जपण्याचा घेतला आता वसा 

मनामनात उमटेल तुझ्याच किर्तीचा ठसा

मराठी मनाचा आहेस आई मराठी तू आरसा||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational