आई झाल्यावर कळेल तुला
आई झाल्यावर कळेल तुला
असायचे टोमणे सततचे मला,
आई झाल्यावर कळेल तुला
लेकरासाठी तिचा जीव किती तीळ तीळ तुटतो,
त्राण नसताना त्तिला पान्हा कसा फुटतो
कधी करावे प्रेम लेकरावर,
तर कधी बोलावे ओरडून त्यांच्यावर
कशी असते माया ही आईची,
कळेल तुला भाषा ही प्रेमाची
आई झाल्यावर कळेल तुला,
काय त्रास होतो या जीवाला
