आई बाबांचा आशीर्वाद
आई बाबांचा आशीर्वाद
तुझ्या नाळेशी जुळलेलं नातं जेव्हा कळलं,
काय ? सांगु आई मन माझ किती तळमळलं...
श्वासात घेतांना श्वास माझ्यावर जग हसलं,
काय ? सांगु बाबा झिजणाऱ्या पाठीवर आभाळ कोसळलं...
जेव्हा चालु लागले वाट मी स्वतः पावलांनी ,
काय ? सांगू आईबाबा प्रत्येक मैलाच्या दगडाने ठेचाळलं...
सोपी होत गं तुझ्या पदराखाली लेकरू मी,
काय ? सांगु आई उन्हाच्या झळानी मला किती करपलं...
विश्वास होता मला तुमचा चांगलच कराल तुम्ही,
काय ? सांगु बाबा सोसतानां कष्ट तळहाताला किती पोळलं...
आईबाबा तुमचा आशीर्वाद असू द्या कायम असाच,
काय ? सांगु तुमच्याच भरोश्यावर मी हे जीवन पेललं...