आगमन गणरायाचे
आगमन गणरायाचे
आला आला आला, गणपती आला
आनंद झाला हो, आनंद झाला हो //ध्रु//
गणेश चतुर्थी, आगमन झाले
सकल भक्त हे, नाचाया लागले
किती मी सांगू हो, मोद जहाला हो (1)
गजानना तव, रुप मनोहर
चिंता हरविसी, तूचि विघ्नहर
वाट पहाती हो, आनंद झाला हो (2)
विद्या नि कलांचा, तूच अधिपती
संकट विघ्नांना, तूच हरविसी
नाचू गाऊ या हो, या बाप्पा आला हो (3)
श्रद्धा हो भक्तांची, आहे मनोमनी
हरशील चिंता, विघ्ने हरवूनी
तूच रक्षक हो, तूच तारिसी हो (4)
